इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली
इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली हे मुंबईतून इंग्लिश भाषेत प्रकाशित होणारे एक भारतीय साप्ताहिक आहे. वीकली समिक्षा ट्रस्ट या संस्थेकडून प्रकाशीत केले जाते. या साप्ताहिकाची स्थापना १९४९ मध्ये झाली. साप्ताहिकाचे सध्याचे संपादक राममनोहर रेड्डी आहेत. तत्पुर्वीचे संपादक कृष्ण राज होते. अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, व क्वचित साहित्य अशा विविध विषयांवर संशोधनात्मक शोध निबंध व इतर लेख या नियतकालिकात प्रकाशित होत असतात. राजकारणी विषयांवर नेहमी डावी भूमिका घेण्याबद्दल हे साप्ताहिक प्रसिद्ध आहे. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमधले संपादकीय लेख विविध विषयांवर तीव्र भूमिका घेतात पण नेहमीच सामाजिक जाणिवेतून लिहीलेले असतात असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ] भारतातल्या व भारतातबाहेरच्या अनेक महत्त्वाच्या लेखकांनी इकॉनॉमिक ॲण्ड पॉलिटिकल विकलीमध्ये लिहिले आहे.
scientific journal | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | academic journal | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | सामाजिक शास्त्र | ||
मूळ देश | |||
वापरलेली भाषा | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||