इंदुमती बाबूजी पाटणकर
इंदुमती पाटणकर (इंदुताई) ह्या एक स्वातंत्र्य सेनानी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या कासेगाव, महाराष्ट्र येथील होत्या. त्यांचे वडील दिनकरराव निकम हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये १९३० च्या दरम्यान होते, व सत्याग्रहासाठी कैदेत असताना व्ही. डी. चितळेंना वगैरेंना भेटून ते साम्यवादी झाले. इंदुताईने १०-१२ वर्षाच्या असतानाच 'वोल्गा ते गंगा' सारखी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. तेव्हाच त्यांनी काँग्रेसच्या प्रभात फेरींमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, व स्वातंत्र्यता आंदोलनातील नेत्यांची मदत केली. त्यांनी राष्ट्र सेवा दल येथे जायला सुरुवात केली.[१]
इंदुमती बाबूजी पाटणकर | |
---|---|
जन्म |
१५ सप्टेंबर, १९२५ इंदोली, सातारा, महाराष्ट्र |
मृत्यू |
१५ जुलै २०१७ |
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
टोपणनावे |
इंदुताई |
शिक्षण |
माध्यमिक शाळा व विद्यालय |
प्रशिक्षणसंस्था | कासेगाव शिक्षण संस्था, आझाद विद्यालय |
ख्याती | भारतीय स्वातंत्र्यलढा, श्रमिक मुक्ती दल |
वैयक्तिक जीवन
संपादन१९४२ रोजी इंदुताईने वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे घर सोडले व स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांनी महिलांना संघटित केले व राष्ट्र सेवादलाचा प्रसार केला. त्यांने १९४३ मध्ये 'प्रति सरकार'च्या गुप्त आंदोलनात भाग घेतला व सेनानींना दारुगोळा पोचवण्याचे काम केले. इंदुताईने १ जानेवारी १९४६ला क्रांतिवीर बाबूजी पाटणकर, जे नाना पाटील यांच्या 'प्रति सरकार'च्या आंदोलनात सहभागी होते, त्यांच्याशी लग्न केले. दोघेही प्रति सरकारचे अग्रगण्य कार्यकर्ते होते. बाबूजी व इंदुताईंनी कासेगाव शिक्षण संस्थेचे व कासेगावमधली पहिली शाळा, आझाद विद्यालय ह्याची स्थापना केली. त्या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनींपैकी एक होत्या व पुढे त्याच शाळेवर शिकवायला लागल्या.[२]
कृतिवाद व चळवळ
संपादनइंदुताई व बाबूजी हे दोघेही सोशालिस्ट पक्षाचे सदस्य झाले. पक्षातील वैचारिक व राजनैतिक मतभेदामुळे ते अरुणा असफ अली यांचा सोशालिस्ट पक्ष (मार्क्सवादी - लेनिनवादी) ह्यामध्ये सामील झाले. १९५२ साली ते दोघे साम्यवादी झाले. बाबूजींच्या हत्येनंतर इंदुताईने एकटीने कुटुंब व त्यांच्या मुलगा भारत ह्याला सांभाळले. साम्यवादी पक्षाच्या कामांमध्येपण त्या सक्रिय होत्या. इंदोली सारखेच आता कासेगावही साम्यवादी चळवळीचे केंद्रस्थान झाले होते. तिने सतत महिला, शेतकरी व कामगाराच्या अधिकारांसाठी चळवळी चालवल्या. तिने परित्यक्त महिलांच्या संघर्षाला आघाडी दिली. ती चळवळ १९८८ पासून सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सुरू आहे.
त्यांचा मुलगा भारत पाटणकर व सून गेल ऑम्वेट हे दोघे श्रमिक मुक्ती दल ह्या कामगार अधिकाराच्या चळवळीत सक्रिय आहेत. इंदुताईने दलित नेतृत्व चळवळीलापण नेतृत्व दिले. त्यांची सून गेल ही त्यांना पहिल्यांदा दलित चळवळीबाबत भेटण्यासाठीच कासेगाव येथे आली होती.[३]
१५ जुलै २०१७ रोजी इंदुताई ह्यांचे थोड्या आजारीपणानंतर निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय ९१ होते.[४][५]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Life given to a cause (इंग्रजी मजकूर)" (PDF). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Struggles of women(इंग्रजी मजकूर)". 2015-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Becoming Indian being Indian(इंग्रजी मजकूर)".
- ^ "Indian freedom fighter Indumati Patankar passes away at 91 in Satara(इंग्रजी मजकूर)". 2017-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-25 रोजी पाहिले.
- ^ "Freedom fighter Indumati Patankar passes away at 91 (इंग्रजी मजकूर)".
- http://www.manushi-india.org/issues/issue_cover20.htm Archived 2018-05-26 at the Wayback Machine.
- http://www.soppecom.org/pdf/mainstreaming%20rights%20of%20deserted%20women-report.pdf
- http://www.slideshare.net/urbancowboy/shoshit-shetkari-kashtkari-kamgar-mukti-sangharsh-sskkms
- http://www.indiavotes.com/ac/details/30/14358/93
- https://seekingbegumpura.wordpress.com/2013/03/10/womens-rally-on-march-8/