रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क
रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क [a] हा १९८१मध्ये प्रदर्शित अमेरिकन थरारपट आहे. याची कथा जॉर्ज लुकास आणि फिलिप कॉफमन यांनी लिहिली तर स्टीव्हन स्पीलबर्गने हा चित्रपट दिग्दर्शित केला. इंडियाना जोन्स शृंखलेच्या या पहिल्या चित्रपटात हॅरिसन फोर्ड इंडियाना जोन्सच्या भूमिकेत आहे.
रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क | |
---|---|
संगीत | जॉन विल्यम्स |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | १९८१ |
याचे कथानक १९३६मध्ये सुरू होते. इंडियाना जोन्स एक प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ असून बायबलमध्ये उल्लेखित आर्क ऑफ द कव्हेनन्ट या वस्तूचा माग काढीत आहे. ज्याच्या हातात हे असेल त्याचे सैन्य सदा अजिंक्य राहील अशी आख्यायिका आहे. त्याच वेळी नाझी जर्मन अधिकारीही याच्या मागे आहेत. जोन्स आणि त्याची पूर्वीची प्रेयसी मॅरियन रेव्हनवूड ( कॅरेन अॅलन ) हे दोघे मिळून प्रतिस्पर्धी पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. रेने बेलोक (पॉल फ्रीमन) यांना आर्क मिळू देत नाहीत.
भूमिका
संपादन- इंडियाना जोन्सच्या भूमिकेत हॅरिसन फोर्ड
- मॅरियन रेव्हनवूडच्या भूमिकेत कॅरेन अॅलन
- रेने बेलोकच्या भूमिकेत पॉल फ्रीमन
- सल्लाच्या भूमिकेत जॉन ऱ्हिस-डेव्हिस
- मार्कस ब्रॉडीच्या भूमिकेत डेन्होम इलियट : एक संग्रहालय क्युरेटर आणि जोन्सचा विश्वासू मित्र
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;ebertGreatest
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;IndieWireName
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;EbertTitle
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.