इंग्लंडची संसद
इंग्लंडची संसद हे १२६५ ते १७०७ पर्यंत इंग्लंडचे विधिमंडळ होते. १२१५मध्ये इंग्लंडचा राजा जॉनने मॅग्ना कार्टाला मंजूरी दिल्यावर इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना शासनात त्यांच्या शाही सल्लागार मंडळाचा सल्ला घेणे भाग पडले. त्यांच्या संमतीशिवाय राजाने कोणताही नवीन कर लादता येणार नाही अशी यातील एक मुख्य तरतूद होती. या शाही मंडळाचे पुढे संसदेत रूपांतर झाले.
या सभागृहाने हळूहळू इंग्लंडच्या राज्यकर्त्यांकडे असलेली अमर्याद सत्तेला अंकुश घातला. याच्याविरुद्ध लढलेल्या पहिल्या चार्ल्सचा शिरच्छेद झाल्यावर संसदेची सत्ता ही इंग्लंडमधील प्रमुख सत्ता झाली. चार्ल्स दुसऱ्याला राजेपदी बसविल्यावर संसदेने भविष्यातील राजे नाममात्र असतील असे जाहीर केले.
१७०७ साली इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या राज्यांचे एकत्रीकरण झाल्यावर इंग्लंडची संसद आणि स्कॉटलंडची संसद एकत्र झाल्या आणि त्यांचे ग्रेट ब्रिटनच्या संसदेत रूपांतर झाले.