आसू

(आसू (फलटण) या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?आसू

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर फलटण
विभाग सातारा विभाग
जिल्हा सातारा जिल्हा
तालुका/के फलटण
भाषा मराठी

गावाचे स्थान

संपादन

आसू गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या ईशान्येकडील एक गाव आहे. या गावाच्या तिन्ही बाजूंना नीरा नदीने वळसा दिलेला आहे. नदीपलीकडे शेजारी सोनगाव आहे. या दोन्ही गावांमध्ये नीरा-कऱ्हा नद्यांचा संगम आहे. गावात काळभैरवनाथाचे देऊळ आहे. या देवाच्या नावाने अक्षय्य तृतीयेनंतर तीन दिवसांनी गावात जत्रा भरते.

लोकसंख्या

संपादन

आसू हे गाव फलटण तालुक्यातील शेवटच गाव आहे .गावामध्ये जवळपास ११८१ कुटुंब राहतात.[]२०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या ५८७६ आहे. ५८७६ पैकी ३०५१ पुरुष आणि २८२५ स्त्रियांची संख्या आहे. ० ते ६ वयोगटातील ७२६ मुल/मुली आहेत.० ते ६ वयोगटातील मुलांची संख्या एकूण लोकसंखेच्या १२.३६% आहे. गावामध्ये जवळपास सर्व जाती धर्माचे लोक राहतात. गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

  1. ^ http://www.census2011.co.in/data/village/563297-asu-maharashtra.html