आष्टी (शहीद)
आष्टी (शहीद) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील तालुक्याचे एक गाव आहे. हे गाव नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या तळेगाव (श्यामजीपंत) पासून सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.१९४२च्या स्वातंत्र्य लढ्यात या गावातील लोकांनी अनमोल योगदान दिले आहे.तेथिल लोकांनी त्यावेळी ब्रिटिश पोलीस ठाणेही जाळले. तेथे भरपूर निसर्ग सौंदर्य बघावयास मिळते.