आशीर्वाद हा आयटीसी लिमिटेडच्या मालकीचा एक ब्रँड आहे. ही मुख्यतः अन्न आणि स्वयंपाकघरातील घटकांचा ब्रँड आहे. [] आशीर्वाद कंपनीच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये पीठ, मीठ, मसाले आणि झटपट तयार होणारे पदार्थ समाविष्ट आहेत.

आयटीसीने २ मे २००२ रोजी बंगाल आणि चंदीगडमध्ये आशीर्वाद आटा (पीठ) बाजारात आणून ब्रांडेड पीठाच्या बाजारात प्रवेश केला. आता हे उत्पादन संपूर्ण भारतभर उपलब्ध आहे. []

आशीर्वाद हे पीईटी पॉली प्रकारचे पॅकेजिंग वापरतात. यांची मधुबनी नावाची उत्पादने ग्रामीण भागातील शेतीच्या प्रक्रियेचे प्रदर्शन करते. []

सिलेक्ट आटा

संपादन

आशीर्वाद सिलेक्ट आटा हा शरबती गव्हापासून बनविला जातो जो मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातून येतो. आशिर्वाद सिलेक्ट आटा (५ किलोग्राम पॅक) याला ग्राहक पॅक प्रकारातील पॅकेजिंगमध्ये उत्कृष्टतेसाठी वर्ल्ड स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. []

आयटीसीने २६ मार्च २००३ रोजी ‘आशीर्वाद सॉल्ट’ या ब्रँड नावाने ब्रँडेड पॅकेज केलेले मीठ बाजारात आणले होते. []

मसाले

संपादन

मे २००५ मध्ये उत्तर भारतात आशिर्वाद मसाले बाजारात आणल्यामुळे आयटीसी ब्रांडेड मसाल्यांच्या बाजारात प्रवेश झाला. सध्या ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम आणि ५०० ग्रॅमच्या वजनामध्ये मिरची, हळद आणि कोथिंबीर पावडर बाजारात आहेत. []

कंपनीने जुलै २००७ मध्ये आशिर्वाद सिलेक्ट सेंद्रिय मसाल्यांच्या प्रक्षेपणानंतर सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या किरकोळ विक्रीमध्ये प्रवेश केला. आशिर्वाद सिलेक्टमध्ये सध्या मिरची, हळद आणि कोथिंबीर पावडर उपलब्ध आहेत. सेंद्रिय मसाले १०० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध आहेत. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "ITC Foods Business | Ready to Eat Packaged Foods". www.itcportal.com. 2017-12-21 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Aashirvaad". ITC. 23 June 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Aashirvaad Story". Aashirvaad. 2018-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 June 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Aashirvaad Products". Diamond Enterprises. 20 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 June 2013 रोजी पाहिले.