आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
(आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Армя́нская Сове́тская Социалисти́ческая Респу́блика; आर्मेनियन: Հայաստանի Սովետական Սոցիալիստական Հանրապետություն) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली आर्मेनियाचे प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आर्मेनियाने शरणागती पत्कारली व आर्मेनियाला सोव्हिएत संघामध्ये विलिन करण्यात आले.
आर्मेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य Армя́нская Сове́тская Социалисти́ческая Респу́блика Հայաստանի Սովետական Սոցիալիստական Հանրապետություն | ||||
|
||||
|
||||
राजधानी | येरेव्हान | |||
अधिकृत भाषा | आर्मेनियन, रशियन | |||
क्षेत्रफळ | २९,८०० चौरस किमी | |||
लोकसंख्या | ३२,८७,७०० | |||
–घनता | ११०.३ प्रती चौरस किमी |
२१ सप्टेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत आर्मेनियाचे आर्मेनिया देशामध्ये रूपांतर झाले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत