आरफळ
आरफळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
?आरफळ आरफळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सातारा |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच 11 |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनहे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद (३६ किमी/तास) आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनआरफळ हे गाव विविध प्रकारच्या प्रेक्षणीय स्थळांनी नटलेले आहे.हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून ना ना प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती व त्याचबरोबर विविधता देखील आपल्याला येथे बघायला मिळते. सातारा शहरापासून पासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील या गावाची ग्रामदैवत श्री काळेश्र्वरी देवी आहे.वडुथ या गावाला मागे टाकले की आरफळ गावाची कमान लागते.कमानीतून आतमध्ये प्रवेश करताच भर चौकात देवी काळूबाई चे भव्य दिव्य असे मंदिर आहे.दरवर्षी एप्रिल मे महिन्यात या देवीची यात्रा भरते.या मंदिराला लागूनच बजरंग बलींचे मंदिर आहे.या मंदिरात प्रवेश करताच मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली देवी सटवाई आई हीचे याच गावात जागृत देवस्थान आहे.हजारो भक्त दर मंगळवार आणि शुक्रवार या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.एखाद्या जोडप्याला पहिला मुलगा झाला की या ठिकाणी त्याचे जावळ काढले जाते. आरफळ गावाला अनेक आजी-माजी सैनिकांचा वारसा लाभलेला आहे. गावात राम लक्ष्मण सीता यांचे सुंदर असे मंदिर आपणास पाहायला मिळते.गावाच्या एका बाजूने धोम धरणाचा डावा कालवा वाहतो व एका बाजूने कृष्णामाई.सुंदर निसर्गरम्य अशा गावात पाण्याच्या प्रवाहावर चालणारा एक भला मोठ्ठा विद्युत प्रकल्प आहे. गावाला अनेक शुरविरांचा वारसा लाभलेला दिसून येतो .आळंदी ते पंढरपूर वरीचे जनक श्री संत हैबतबाबा पवार हे देखील याच गावचे .