आयटीआर-२

(आयटीआर-2 या पानावरून पुनर्निर्देशित)

आयटीआर-2 अर्ज संपादन

भारतीय आयकर विभागामध्ये भारतीय नागरिक तसेच अनिवासी भारतीय यांचेकडून आयकर दाखल करण्यासाठी आयटीआर-2 हा महत्त्वाचा अर्ज आहे. आयकर कायदा, 1961 आणि आयकर नियम, 1962 अन्वये नागरिकांनी आयकर विभागामध्ये प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस कर परतावा दाखल करणे बंधनकारक आहे आणि भारतीय शासनाने नमूद केल्यानुसार कर दाखल करण्याच्या पद्धतीमधील सदर अर्ज हा एक भाग आहे.

भारतीय आयकर विभागामध्ये आयकर दाखल करण्याची अंतिम तारीख दर वर्षाची 31 जुलै अशी आहे. भारतीय आयकर विभागाकडून किंवा वित्त् मंत्रालयाकडून निर्देश मिळाल्यास यामध्ये बदल घडू शकतो. दरवर्षी 31 मार्च रोजी वित्तीय वर्ष संपत असल्यामुळे करनिर्धारक व्यक्तींना त्यांचा आयकर परतावा तयार करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी असतो.

आयटीआर-2 अर्जासाठी पात्रता[१] संपादन

आयटीआर-2 अर्जाचा वापर केवळ खालील साधनांद्वारे वेतन मिळणा-यांसाठी लागू आहे. सदर अर्ज व्यक्ती तसेच हिंदू अविभाजित कुटुंब या दोघांसाठी उपलब्ध आहे. खालील साधनांद्वारे वेतन मिळणा-या व्यकतींनी सदर अर्ज भरून आयकर विभागाकडे सादर करावयाचा आहे.

  • वेतन किंवा निवृत्ती वेतनाद्वारे उत्प्‍न्न् मिळत असलयास
  • गृह मालमत्ताद्वारे उत्प्‍न्न् मिळत असल्यास
  • भांडवली लाभाद्वारे उत्प्‍न्न् मिळत असलयास
  • इतर साधनाद्वारे उत्प्‍न्न्
  • मिळत असल्यास (सोडतीमध्ये , घोडयांच्या शर्यतीमध्ये आणि कायदेशीर जुगाराद्वारे मिळणारे उत्प्‍न्न्)

पत्नी व अज्ञान मूल इ. यांचे वरील साधनांद्वारे उत्पन्न असलयास आयकर रीटर्न एकत्रितरीत्या करता येतील. त्यानंतर त्यांचे रीर्टर्न एकत्रितरीत्या दाखल करता येतील. यापैकी वेगळया साधनांद्वारे उत्प्‍न्न् मिळत असलयास करनिर्धारण व्यक्तीला वेगळा आणि लागू असलेला अर्ज भरावा लागेल.

आयटीआर-2 अर्जासाठी अपात्र[२] संपादन

  • एखादया व्यकती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब यांना पूर्णपणे किंवा काही उत्प्‍ान्न्
  • व्यापार किंवा धंदया द्वारे मिळत असल्यास
  • ज्या व्यकती आयटीआर-१ सहज अर्ज भरण्यास पात्र्‍ आहेत
  • भागीदारामध्ये भागीदार म्हणून ज्या व्यकतीची नियुक्ती केलेली आहे त्या आयटीआर-2[३] अर्ज भरण्यास अपात्र आहेत.

वेतनधारी व्यकतींना विशेष सूट[४] संपादन

भारतीय आयकर विभागाच्या निर्देशानुसार रु.पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न् असलेल्या वेतनधारी व्यकतींना आयकर रीटर्न् दाखल करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे. बँकेमधील बचत खात्यामध्ये रु. दहा हजारापेक्षा कमी व्याज मिळणा-यांसाठी केवळ हा नियम लागू आहे. रु. दहा हजारापेक्षा जास्त् व्याज मिळणा-यांनी आयकर रीटर्न दाखल करावयाचा आहे.

काही ठराविक प्राप्ति धारकांना ई फाईलिंग बंधनकारक[५] संपादन

प्रत्यक्ष कराच्या कंद्रिय विभागाकडून रु.दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळणा-या व्यकती आणि हिंदू अविभाजित कुटुंब यांना आयकर रीटर्न ई फाईलिंग पद्धतीद्वारे भरणे बंधनकारक आहे. सदर गटात समाविष्ट असलेल्या करनिर्धारक व्यकतींना हाताने रीटर्न दाखल करण्याची सुविधा नाही. सदर गटातील व्यक्तींनी त्यांचा आयकर रीटर्न इलेक्टॉनिक पद्धतीने दाखल करावयाचा आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "मूल्यांकन वर्ष 2011-2012 प्रपत्र आयटीआर-2 भरण्यासाठी सूचना" (इंग्लिश भाषेत). 2013-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "आयटीआर-2" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2012-09-15. 2013-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "आयटीआर-2 - व्यक्तिगत आणि HUFs साठी ऊत्पन्न व्यवसाय किंवा पेशा येत नाही" (इंग्लिश भाषेत). 2013-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  4. ^ "आयकर रीटर्न - ई दाखल सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट विस्तारित" (इंग्लिश भाषेत). 2013-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "ई दाखल सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट विस्तारित" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-10-17. 2013-07-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)