आयएनएस चक्र
आय.एन.एस. चक्र ही भारतीय आरमाराची अकुला वर्गातील अणुशक्ति चलित लढाऊ पाणबुडी आहे. रशियन बनावटीची ही पाणबुडी जानेवारी २३, इ.स. २०१२ रोजी सेवेत दाखल झाली. याचे पूर्वीचे नाव के-१५२ नेर्पा असे होते. ही पाणबुडी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आली. ७३ नौसैनिकांसह पाण्याखाली सलग १०० दिवस राहण्याची तिची क्षमता आहे.