आठल्ये हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांत आढळते. सातारा जिल्ह्यातील पाटण गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या आटोली गावातून कोकणात आल्यामुळे यांना आटोलीये असे म्हणत असत.[] त्याचा अपभ्रंश आठल्ये असा झाला. आठल्ये हे काश्यप गोत्री कऱ्हाडे ब्राह्मण आहेत. हे आडनाव रत्‍नागिरी जिल्ह्यात विशेषतः संगमेश्वर व लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळते.

हे आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती:-

१. अलका कुबल-आठल्ये (प्रसिद्ध अभिनेत्री)

२. वेदमूर्ती विनायक सीताराम आठल्ये - आठल्ये गुरुजी (वेदविद्याविभूषित, प्रकांड पंडित )

३. कृष्णाजी नारायण आठल्ये (कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक)

  1. ^ http://harihareshwardevasthanshiposhi.in/history%20of%20athalye.html