आट्यापाट्या हा महाराष्ट्रातील एक मैदानी खेळ आहे. हा भारतातील इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो. तुकारामाच्या अभंगावरून हा त्यांच्या काळातही होता असे दिसते[ संदर्भ हवा ].

आटापाट्या हा खेळ दोन संघांत खेळला जातो. त्याचे क्रीडांगण सुमारे ९० फूट लांब बाय ११ फूट रुंद या आकारमानाचे असते. ते मैदान एक उभी पाटी (सुरपाटी) आणि नऊ आडव्या पाट्यांनी (संरक्षण पाट्यांनी) विभागलेले असते. आटापाट्याच्या खेळात एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंची ठराविक पाटीत अडवणूक करतात. व त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत हुलकावणी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या खेळात अडवणूक, पाठशिवणी, हुलकावणी या तीनही तंत्रांचा वापर होतो.