आजचा सुधारक (मासिक)

(आजचा सुधारक या पानावरून पुनर्निर्देशित)

आजचा सुधारक हे नागपूर येथून प्रसिद्ध होणारे एक मराठी मासिक आहे. एप्रिल १९९० पासून मार्च २०१७ पर्यंत सतत २७ वर्षे छापील स्वरूपात प्रकाशित होत असे. सध्या हे on-line पद्धतीने त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित केले जाते. यामध्ये प्रामुख्याने चिंतनशील व विवेकवादी लेखनाचा अंतर्भाव असतो.

आजचा सुधारक
प्रकार
भाषा मराठी
पहिला अंक एप्रिल १९९०
देश भारत
मुख्यालय नागपूर
संकेतस्थळ https://www.sudharak.in

नाव आणि पार्श्वभूमी

संपादन

‘आजचा सुधारक’ हे मासिक विवेकवादी तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि.य. देशपांडे यांनी एप्रिल १९९०मध्ये सुरू केले. ‘आजचा सुधारक’चे आधीचे नाव ‘'नवा सुधारक'’ असे होते. ते नंतर डिसेंबर १९९० च्या अंकापासून बदलून आजचा सुधारक असे करण्यात आले. गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक या साप्ताहिकाचा समकालीन नवा अवतार म्हणून हे मासिक सुरू झाले. या मासिकपत्रात विवेकवादी तत्त्वज्ञानाचे सर्व बाजूंनीं विवेचन आणि चर्चा करण्यात येईल. विवेकी जीवन म्हणजे काय? याचा सांगोपांग ऊहापोह केला जाईल, असे या अंकाच्या पहिल्या संपादकीयात म्हणले होते.

बाह्य दुवे

संपादन