आचारनियम ही समाजधारणेच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीशी वेगवेगळ्या प्रसंगी कसे असावे, याविषयी समाजात रूढ असलेल्या संकेत सूचकांची एक अमूर्त आणि सर्व समावेशक अशी चौकट आहे. या चौकटीत शिष्टाचार, लोकाचार, लोकनिती, लोकरूढी, कायदे, संस्था, इ.चा समावेश असतो. आचारनियमांची ही चौकट सर्व समाजाला आधारभूत असते. म्हणून समाजशास्त्रात तिला महत्त्व प्राप्त झाले आहे.

निरनिराळ्या व्यक्तींतील व गटांतील संबंध नियमाने निबद्ध नसले, तर समाजात अस्थिरता उत्पन्न होईल. व्यक्तीव्यक्तींतील संबंध किंवा व्यक्ती व समाज यांतील संबंध हे निर्दिष्ट आचारांच्या पालनामुळेच प्रस्थापित होतात. परस्परसंबंध येणाऱ्या व्यक्तिव्यक्तींच्या सामाजिक स्थानास अनुसरून त्यांच्या भूमिकेविषयी व परस्परवर्तनाविषयी एकमेकांच्या अपेक्षा यामुळेच ठरलेल्या असतात. या अपेक्षापूर्ती करण्याचे आचार हे एक साधन आहे.

एखाद्याकडून आचारधर्म पाळला गेला नाही तर तत्संबंधित व्यक्तींचा अगर गटांचा अपेक्षाभंग होतो व सामाजिक संबंधाना धोका उत्पन्न होतो. साहाजिकच त्यातून सामाजिक अस्थिरता उद्भवते. ही अस्थिरता आचार–नियमांच्या पालनाने टाळता येते. सामाजिकरणाच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक पिढीस आचारधर्माचे शिक्षण योग्य तऱ्हेने मिळू शकते.

मनुष्य जन्माला आल्यापासून सामाजिकरणामुळे त्याचे आयुष्य आचारयुक्त बनते व त्या दृष्टीने व त्या दृष्टीने त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तशी समजही दिली जाते. आचारनियम हे अनौपचारिक प्रसंग किंवा गट आणि औपचारिक प्रसंग किंवा गट यांच्या बाबतीत वेगवेगळे असतात. तसेच नियमबाह्य वर्तनाची दखलही या दोन्ही बाबतीत भिन्न रीतीने घेतली जाते. आपल्या पेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना नेहमी आदरार्थी बोलवले जाते.या आचरणात येतात अश्या गोष्टी घरात च शिकवल्या जातात. उदा. वडील किंवा मोठा भाऊ यांना

दादा,आबा,अण्णा,भाऊ,तात्या,आप्पा,नाना,बापू.

आई किंवा मोठ्या बहिणी यांना आई,आऊ,माई,अक्का,ताई,बाय,जिजी इत्यादी