आखन विद्यापीठ (आर.डब्ल्यु.टी.एच. आखन) हे जर्मनीतिल आखन शहरात असून हे जर्मनीतिल अग्रणीचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे पूर्ण नाव ऱ्हाइनिश वेस्टफालिशे टेक्निशे होकशुले(RWTH Aachen) आहे. इंग्रजीत ऱ्हाइनिश वेस्टफालियन टेक्निकल युनिव्हर्सिटी अथवा आखन विद्यापीठ असेही संबोधले जाते. या विद्यापीठाचा केवळ जर्मनीतच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अत्युच्च दर्जाचे विद्यापीठ म्हणून मानले जाते. बहुतेक जर्मन विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठाचादेखील भर संशोधनावर आहे.