आईन इ अकबरी
(आईना-ए-अकबरी या पानावरून पुनर्निर्देशित)
अबुल फझल याने लिहीलेल्या अकबरनामा या ग्रंथाच्या तीन भागांपैकी जो तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागालाच आईन इ अकबरी म्हणून ओळखले जाते. आईन इ अकबरीचे पाच विभाग आहेत. पहिल्या दोन विभागात बादशहा, त्याचे कुटुंब, दरबार, नोकरचाकर, त्यांची कामे इत्यादींची माहिती दिलेली आहे. तिसऱ्या विभागात न्यायव्यवस्थेचे वर्णन, चौथ्या विभागात भारतीय जनतेचे विशेषतः हिंदूंचे सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे वर्णन केलेले आहे. अंतिम पाचव्या विभागात कवींच्या स्फुट रचना व म्हणींचा संग्रह आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |