आंद्रेआ देल व्हेरोक्कियो
आंद्रेआ देल व्हेरोक्कियो [१] तथा आंद्रेआ दि मिशेल दि फ्रांचेस्को दे चिओनी (१४३५ - १४८८) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील सोनार, शिल्पकार आणि चित्रकार होता. फिरेंझे शहरातील एक मोठे चित्र आणि शिल्पदालन याच्या मालकीचे होते.
याने आपल्या गुरुचे नाव व्हेरोक्कियो हे नाव घेतल्याचे समजले जाते. याने काढलेल्या बहुसंख्य चित्रांपैकी काही नक्की त्याने काढल्याचे पुरावे आहेत. व्हेरोक्कियोने लिओनार्दो दा विंची, पिएत्रो पेरुजिनो, लॉरेन्झो दि क्रेदी यांना प्रशिक्षण दिले होते. त्याचे सगळ्यात प्रसिद्ध शिल्प व्हेनिसमधील बार्तोलोमिओ कॉलेओनीचा अश्वारूढ पुतळा हे त्याचे शेवटचेच काम होते.
संदर्भ
संपादन- ^ "Verrocchio". Collins English Dictionary. HarperCollins. 31 May 2019 रोजी पाहिले.