अहमद शाह पहिला, गुजरात

अहमद शाह पहिला (?? - इ.स. १४४२) हा पंधराव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. हा इ.स. १४११ ते इ.स. १४४२पर्यंत सत्तेवर होता.

मुझफ्फरी वंशाचा पहिला सुलतान असलेल्या अहमदशाहने अहमदाबाद आणि अहमदनगर (आताचे हिंमतनगर) ही शहरे वसवली.

अहमद शाहची कबर अहमदाबादच्या माणेक चोक भागात आहे.