अहमदनगर (चिनिओट जिल्हा)
अहमदनगर याच्याशी गल्लत करू नका.
अहमदनगर नावाची दोन शहरे पाकिस्तानतल्या पश्चिम पंजाब प्रांतात आहेत. एक चिनिओट जिल्ह्यात आहे, तर दुसरे गुजराणवाला जिल्ह्यात.
अहमदनगर (चिनिओट)
संपादनपूर्वी झांग जिल्ह्याचा एक तालुका असलेल्या चिनिओट जिल्ह्यात अहमदनगर नावाचे एक शहर आहे.
इतिहास
संपादनइ.स. ९९७ साली सुलतान महंमद गझनीने त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली सुलतानियत ताब्यात घेतली. पुढे इ.स. १००५ साली गझनीने काबूलजवळचे शाहीस जिंकले, आणि पाठोपाठ तत्कालीन हिंदुस्थानातला पंजाब प्रांतही जिंकला. पुढे हा प्रदेश मोगलांच्या ताब्यात गेला. सूफी पंथाच्या प्रसारामुळे इथली लोकसंख्या पूर्णपणे मुस्लिमधर्मीय झाली. शीखांच्या राज्यात जे थोडेफार हिंदू होते ते हिंदुस्थानच्या इ.स. १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर भारतात गेले.