अष्टांगसंग्रह
(अष्टांग संहिता या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अष्टांगसंग्रह हा वाग्भट यांनी आयुर्वेदावर लिहिलेला एक ग्रंथ आहे. महर्षी वाग्भट यांनी आपल्या जीवन काळात आयुर्वेदावर एकूण दोन ग्रंथ लिहिले. त्यांतील पहिला ग्रंथ 'अष्टांग संग्रहम्' आणि दुसरा अष्टांगहृदय. पहिल्या ग्रंथातील उणीवा दूर करून मग काही वर्षांनी सुधारित ज्ञानाची भर घालून त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला, असे ते स्वतःच आपल्या दुसऱ्या ग्रंथात लिहितात.
या दुसऱ्या ग्रंथात म्हणजे अष्टांगहृदयमध्ये एकूण ७५०० सूत्रे असून ही सूत्रे एकूण सहा विभागांत विभागलेली आहेत. ते विभाग पुढीलप्रमाणे आहेत :-
०१) सूत्रस्थानम् (३० अध्याय )
०२) शारीरस्थान (६ अध्याय )
०३) निदानस्थान (१६ अध्याय )
०४) चिकित्सास्थान (२२ अध्याय )
०५) कल्पस्थान (६ अध्याय )
०६) उत्तरस्थान (४० अध्याय )
वाग्भटावरील मराठी पुस्तके
संपादन- सार्थ वाग्भट (गणेश कृष्ण गद्रे). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.