अश्मक

प्राचीन दक्षिण भारतातील महाजनपद

अश्मक हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्राचीन भारतात म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात १६ महाजनपदे होती. त्यापैकी अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. या अश्मक महाजनपदाची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे पैठण ही होती. अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजे इश्वाकु वंशीय राजे राज्य करायचे. इश्वाकु वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची म्हणजेच राजधानी प्रतिष्ठानपुरीची स्थापना केली. म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद हे नाव मिळाले.

प्रदेश

संपादन

अश्मक हे महाजनपद दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये संपूर्ण गोदावरी नदीच्या दोन्ही तटावर हे राज्यविस्तारलेले होते. दक्षिण भारतातील सगळे राज्य या महाजनपदाच्या अंतर्गत येत होते. त्याची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे पैठण होती. म्हणजे संपूर्ण दक्षिण भारताचे केंद्र पैठण होते.

दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद