अशोक पाटील (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. माजी राज्यमंत्री अशोक पाटील हे विद्यार्थी, युवक चळवळीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. विद्यार्थीदशेत केलेल्या कार्याची पावती म्हणून अशोक पाटील यांना १९८५ मध्ये चौसाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. अशोक पाटीलच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधुन झाली. त्यावेळी अटीतटीच्या १९८५ निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, युवक व क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. शंकररराव चव्हाण यांचे खंदे समर्थक तसेच माजी पंतप्रधान (कै.) राजीव गांधी यांच्याशी त्यांचे व्यक्तिगत संबंध राहिलेले आहेत. मात्र, 1990 आणि 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याने पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला. त्यानंतर दोन वर्षांतच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षाने अशोक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांना अपयश आले.

अशोक पाटील

आमदार
कार्यकाळ
इ.स. १९८५ – इ.स. १९९०
मतदारसंघ चौसाळा विधानसभा मतदारसंघ

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास बीड

[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "पाटील दांपत्याचे पंधरा वर्षांनंतर राजकीय पुनर्वसन!". Archived from the original on 2016-03-05.