अवांतर धावा (क्रिकेट)
क्रिकेट खेळात, फलंदाजांनी चेंडू न टोलवता इतर मार्गांनी संघाच्या धावसंख्येत जमा होणार्या धावा
क्रिकेट या खेळात, अवांतर किंवा अतिरिक्त धावा म्हणजे अशा धावा ज्या फलंदाजांनी चेंडू न टोलवता इतर मार्गांनी संघाच्या धावसंख्येत जमा होतात.
नो बॉलवर बॅट ने चेंडू टोलवू न काढलेल्या धावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवांतर धावांचे श्रेय फलंदाजाला दिले जात नाही. धावफलकावर अवांतर धावा वेगळ्या मोजल्या जातात आणि संघाच्या एकूण धावसंख्ये तर जमा होतात. ज्या सामन्यात अनेक अवांतर धावा दिल्या जातात तो सामना सहसा अव्यवस्थित गोलंदाजी म्हणून मानला जातो.