अल्लाउद्दीन खिलजी

खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान
(अल्लाउद्दिन खिलजी या पानावरून पुनर्निर्देशित)

अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला अलाउद्दीन खिलजी ची कारकीर्दही मध्ययुगीन भारताचा इतिहास व विशेष सल्तनत काळाच्या संदर्भात विशेष मानली जाते. केंद्रीय आणि प्रांतीय प्रशासनात महत्वपूर्ण बदल घडवून आणले

अल्लाउद्दीन खिलजी
सुलतान
सुलतान अल्लाउद्दीन खिलजी
अधिकारकाळ १२९० ते १३१६
राज्याभिषेक १२९६
राजधानी दिल्ली
पूर्ण नाव अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजी
लख्नौती (बंगाल)[]
मृत्यू १३१६
दिल्ली
पूर्वाधिकारी जलालुद्दीन फिरोझ खिलजी
उत्तराधिकारी कुतुबुद्दीन मुबारक शाह
राजघराणे खिलजी

अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती. गुलाम घराणे नंतर दिल्लीवर राज्य करणारे घराणे म्हणजे खीलजी होय खीलजी हे मूळचे अफगाणिस्तानमधील खल्ज प्रांतातील होते मोहम्मद घोरीच्या स्वारीबरोबर मोहम्मद बखतियार खिलजी भारतात आलेला होता त्याने बंगाल व बिहारवर वर्चस्व प्रस्थापित केले ते पुढे अल्तमश व बलबन या सुलतानाच्या काळातही त्यांनी आपले प्रस्थ तिकुन ठेवले सुलतान शाहीचे सेवक म्हणून ते बंगाल बिहार वर कारभार करत राहिले पण तेराव्या शतकाच्या शेवटी मात्र योग्य नेतृत्व करणारे तुर्की सुलतान नव्हते या काळात दिल्लीतील तुर्कांची जागा त्यांनी घेतली अशासत्तांतराबद्दल इतिहासकार बरणी याने नमूद केले आहे की, "खीलजी यांच्या उदयानंतर सर्व सत्ता तुर्कांच्या हातातून निसटून गेली आणि दिल्लीच्या ज्या लोकांनी गेली ऐंशी वर्षं जन्माने तुर्की असलेल्या सुलतानांची राजवट पाहिली होती त्यांना त्यांच्या जागी खीलजी आलेले पाहून आश्चर्य व आनंद वाटला." यावरून तुर्की सत्तेला उतरती कळा लागली होती अर्थात त्याला तुर्की सुलताना जबाबदार होते हे यावरून दिसून येते. अलाउद्दीन खिलजी हा सल्तनत काळातील पहिला सुलतान ठरला की ज्या सुलताने दक्षिणेचा प्रदेश जिंकून घेण्यासाठी मोहीम आखली आणि ती यशस्वी केली अल्लाउद्दीन खिलजी च्या आधी कुठल्याही सल्तनत शासकाने दक्षिणेवर स्वारी केली नाही मात्र अल्लाउद्दीन खिलजीने स्वतंत्र मोहीम आखून व आपल्या सेनापतींना पाठवून मोठा भूप्रदेश दक्षिणेतील आपल्या वर्चस्वाखाली आणला देवगिरीच्या रामदेवराय यादवांचे राज्य हा या मोहिमेचाच एक भाग ठरला

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.muhammadhassan.org/home/allauddin-khilji