अलगर्द
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अलगर्द हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. हा तारकासमूह ३००० उ. अक्षांशाच्या पलीकडे हा दिसत नाही. यात एकही मोठा तारा नाही. यातील सर्वांत मोठ्या आल्फा ताऱ्याची प्रत तीन आहे. यमुना तथा इरिडानस या समूहातील अग्रनद (आचर्नार) या पहिल्या प्रतीच्या ताऱ्याच्या आग्नेयेस हा तारकासमूह असतो. या समूहाच्या पूर्वेस मोठा मॅगेलनी मेघ व मलयाचल (मेन्सा), पश्चिमेस कारंडव (तुकाना) व छोटा मॅगेलनी मेघ, उत्तरेस जालक (रेटिक्युलम) आणि दक्षिणेस अष्टक (ऑक्टन्स) असे समूह आहेत. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात दक्षिण क्षितिजाजवळ ताऱ्यांच्या नकाशाच्या मदतीने यातील आल्फा तारा पाहणे शक्य होते.