अर्थवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. अर्थशास्त्रसुद्धा अनेक प्रकारचे आहे. जसे नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपशास्त्र आणि चौसष्ट कलांचे शास्त्र. ही शास्त्रे अनेक मुनींद्वारा विरचित आहेत. धनप्राप्तीच्या सर्व उपायांध्यें निपुण असलेल्या पुरुषासहि भाग्यावांचून धनप्राप्ती होत नाहीं. म्हणून अर्थवेदाचेहि वैराग्योत्पत्तीविषयीं तात्पर्य आहे.