अर्जुन वृक्ष
अर्जुन वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
- संस्कृत-अर्जुन, अर्जुनसादडा, अर्जुनाव्हय, इन्द्रू, ककुभ, देवसाल, धनंजय, धाराफल, धूर्तपाद्य, नदीसर्ज, पार्थ, शक्रतरू, क्षीरस्वामी, सर्पण, सेव्य, वगैरे
- मराठी - आईन/ ऐनाचे झाड
- हिंदी-कौहा, कोह
- बंगाली-अर्जुन
- गुजराती-अर्जुन
- मल्याळम-मारुत
- तामिळ-मारुड
- तेलुगू-मदिचट्ट
- इंग्रजी- The White Murdah Tree
- लॅटिन नाव-(टरमीनैलीया अर्जुना)Terminalia arjuna
- कुळ - (कॉम्ब्रीटेसी) Combretaceae
अर्जुनाच्या विविध नावांचे अर्थ
संपादन- अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत.
- नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे.
- पार्थ, धनंजय या पांडवपुत्र अर्जुनाच्या नावांवरून अर्जुनवृक्षालाही ती नावे पडली.
- अनेक वृक्षांपासून चीक मिळतो. पण अर्जुनवृक्षाचा गोंद (चीक) हा सुंदर, पारदर्शक, स्वच्छ, बल्य व पौष्टिक आहे. त्यामुळे अर्जुनवृक्षाला क्षीरस्वामी असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. अर्जुनसादडा, इंद्र्दुम, अर्जुन
इंग्रजी नाव:Terminalia Arjuna (Roxb.) W.& A.Combretaceae मूळ अर्जुन या संस्कृत शब्दाचा अर्थ “पांढरा स्वछ”, “दिवसाच्या प्रकाशासारखा” असा आहे. अर्जुन वृक्षाला त्याच्या पांढऱ्या खोडामुळे हे नाव मिळाले आहे. पांढऱ्या किंचित हिरवट-राखाडी झाक असलेल्या गुळगुळीत खोडाचा हा वृक्ष अस्सल भारतीय वंशाचा आहे. वरचे खोडाचे साल निघून गेल्यावर याचे खोड ताजेतवाने दिसते. वर्षाचे किमान सहा-सात महिने वाहणारे पाणी असणाऱ्या ठिकाणी हा वृक्ष वाढतो. हे वाहणारे पाणी त्याचे बी रुजवतात. हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत तसेच श्रीलंका, मलेशिया, ब्रह्मदेश इथे हा वृक्ष आढळतो. हा एक भव्य वृक्ष आहे. या वृक्षाच्या वाढलेल्या मोठया फांद्या थोडया खाली झुकलेल्या असतात. समोरासमोर देठ असलेली व थोडा लांबट आकार असलेली किंचित फिकट हिरवी पाने, या पानांच्या मागे देठाजवळ, मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूस गोगलगाईच्या शिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दोन लहान ग्रंथी हे याचे वैशिष्टय आहे. ऐन आणि अर्जुन एकाचवेळी पावसाळ्यात फुलणारे व ताक घुसळण्याच्या रवीच्या बोंडाप्रमाणे पाच पंख असलेली फळे धारण करणारे असतात. फरक केवळ खोडात दिसतो. ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले व तपकिरी रंगाचे तर अर्जुनाचे गुळगुळीत व पांढरे असते. त्यामुळेच कोकणात हा पांढरा ऐन म्हणून ओळखला जातो. सालीतील कॅल्शियम मॅग्नेशियम व इतर उपयुक्त घटकांच्या संपन्नतेमुळे हा बलकारक आहे. म्हणून याला धन्वंतरी हे नाव मिळाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रचंड मोठया अर्जुन वृक्षाखाली आहे. म्हणून ते नागार्जुन, तामिळनाडू येथील देवराईत एक भव्य अर्जुन वृक्ष असून त्याच्या खोडाचा घेर ३० फुट आहे. हा वृक्ष सुरुवातीच्या काळात फार हळू वाढतो. सुरुवातीला त्याला पाण्याचे दुर्भिक्ष चालत नाही. याचे देखणे पांढरे खोड असल्यामुळे हा वृक्ष रस्त्यांवर लावण्यालायक आहे.
- ककुभ् म्हणजे दिशा. ज्याचा पसारा सर्व दिशांना पसरलेला आहे, म्हणून अर्जुनसादडाला ककुभ म्हणतात.
- ज्याचे बुद्धिपुरस्सर सेवन केले जाते, अशा त्याला सेव्य असे नाव मिळाले.
- पांढऱ्या रंगाला अर्जुन हा एक प्रतिशब्द आहे, म्हणून ज्याची साल बाहेरून पांढरी दिसतेत्या झाडाला अर्जुन हे नाव पडले असावे. वगैरे वगैरे.
वर्णन
संपादनअर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात. मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अर्जुनाचे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अर्जुनाला पंख्यासारखी छोटी फळे वा बिया असतात. त्या रुजवून त्यांची रोपे सहज करता येतात. अर्जुनाची झाडे नदी, ओढे यांच्या काठावर उतारावर लावल्यास अधिक चांगली रुजतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने ती हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते.
उत्पत्तिस्थान
संपादनभारत
उपयोग
संपादनआयुर्वेदानुसार अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. तसेच त्याच्या फुलांपासून उत्तम नेत्रांजन बनते. अर्जुनासव व अर्जुनारिष्ठ औषधे सालीपासुन बनवतात. अर्जुनची साल दुधासोबत ही खूप गुणकारी आहे पण ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी. मुकामार, हाड तुटणे याच्या सालीचा वापर होतो . कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी व हृदयाचे आकारमान वाढले असल्यास अंर्तसालीचा वापर करावा .
आराध्यवृक्ष
संपादनहा स्वाती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
अर्जुन वृक्षासंबंधी विविध ग्रंथांतील उल्लेख
संपादन- अर्जुनस्य त्वचा सिद्धं क्षीरं योज्यं हृदामये। ... (चक्रधर हृद्रोग चि/ १०)
- श्वेतवल्कलवान् वृक्षः पुष्पं नेत्राञ्जने उपयुज्यते।...(सुश्रुत उत्तरस्थानम् १२.११)
- शीतकषायः रक्तपित्त्प्रशमनः .. (औ.उ. ४५.२३)
- अर्जुनः शीतलो भग्नक्षतक्षयविषास्त्रजित् |(मदनपाल)
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- वनौषधी गुणादर्श- ले. आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे
- गांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)
- Indian Medicinal Plants(IV volume)
- भारतीय वनौषधी (भाग-६)
- ओषधीसंग्रह - लेखक-कै.डॉ.वामन गणेश देसाई