अर्चना जेजुरीकर मुळच्या जेजुरीच्या रहिवासी. त्यांचे खापर पणजोबा जेजुरीजवळच्या कऱ्हेकाठच्या पांडेश्वरचे. तेथून ते जेजुरीला आले, आणि मग नातवंडे पुण्याला आली आणि स्थिरावली. अर्ना जेजुरीकरांच्या आजोबांचे, म्हणजे वडलांच्या वडिलांचे मुंबईत फोर्टमध्ये १९१० सालापासूनचे पुस्तकांचे दुकान होते. त्या काळात ते त्यांच्या दुकानातून परदेशांतून पुस्तके मागवलेली पुस्तके विकीत. भारतातील विद्वान आणि ब्रिटिश माणसे त्यांची गिऱ्हाइके होती. त्यांचा धंदा जोरात चालायचा. झावबाच्या वाडीत त्यांच्या तीन चाळी होत्या. घरी कुटुंबीयांना फिरण्यासाठी सारवट गाडी (छप्पर असलेली घोडागाडी) आणि ती चालवायला पगारी गाडीवान होता.

आजोबांना रेसचे व्यसन लागले आणि चाळी-दुकानासह सर्व फुंकावे लागले. सर्व कुटुंब रस्त्यावर आले. आजोबा घरातून निघून गेले, आजी कच्याबच्यांना घेऊन पुण्याला आली व कसबा पेठेत राहू लागली. लोकांकडे स्वयंपाक करून ती कुटुंबाचा खर्च चालवी. अश्या परिस्थितीत वर येऊन तिने मुलांची शिक्षणे केली. अर्चना जेजुरीकर यांचे शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा, {{एस.पी. काॅलेज]] आणि पुणे विद्यापीठातून झाले. सन १९८६मध्ये त्या एम.एस्‌सी. झाल्या. त्यानंतर त्यांनी Plant Taxonomy and Ethno-Biology या विषयांचे प्रशिक्षण घेऊन त्यांत प्रावीण्य मिळवले.

जंगल आणि पर्यावरण यांच्या रक्षणाचे काम करीत असताना अर्चनाताईंना जगदीश गोडबोले भेटले आणि त्यांच्याशी लग्न करून त्या अर्चना जगदीश गोडबोले झाल्या.

अर्चना जगदीश गोडबोले पुण्यातील Applied Environmental Research Foundation (AERF) या संस्थेच्या प्रमुख आहेत. या संस्थेची स्थापना त्यांनी सन १९९५मध्ये केली. याशिवाय त्या Strategic Climate Fund (SCF)च्या Trust Fund Committeeवर आणि Forest Investment Program (FIP)च्या Sub-Committeeवर Civil Society Observer आहेत.

अर्चना गोडबोले या एक मराठी लेखिकाही आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-

  • नात्यास नाव अपुल्या
  • नागालँडच्या अंतरंगात

अर्चना गोडबोले यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • पश्चिम घाटातल्या पर्यावरणाच्या आणि देवरायांच्या रक्षणासाठी केलेल्या दीर्घकालीन कामाबद्दल Whitley Associated Award (२००७)