अरुण बालकृष्ण कोलटकर
अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.
अरुण कोलटकर | |
---|---|
जन्म नाव | अरुण बालकृष्ण कोलटकर |
जन्म |
१ नोव्हेंबर, इ. स. १९३२ कोल्हापूर |
मृत्यू |
२५ सप्टेंबर, इ. स. २००४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी, इंग्रजी |
साहित्य प्रकार | कविता |
चळवळ | भारतीय आधुनिकोत्तरतावाद |
प्रसिद्ध साहित्यकृती | "जेजुरी" |
प्रभाव | विल्यम कार्लोस विल्यम्स |
परिचय
संपादनकोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.[१]
प्रकाशित काव्यसंग्रह
संपादनमराठी
संपादन- अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
- चिरीमिरी (२००४)
- द्रोण (२००४)
- भिजकी वही (२००४)
- अरुण कोलट्करच्या चार कविता
इंग्रजी
संपादन- कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
- जेजुरी
- काळा घोडा पोएम्स
- द बोटराईड अँड अदर पोएम्स
- सर्पसत्र
पुरस्कार
संपादन- २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार
- कुसुमाग्रज पुरस्कार
- २००५ चा बहिणाबाई पुरस्कार
- १९७६ चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार
इतर
संपादन- अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.
बाह्य दुवे
संपादन- ^ अरुण कोलटकर : पहिल्या कविता, लेख, समीक्षेचा अंतःस्वर. देवानंद सोनटक्के पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१२