अरविंद व्यंकटेश गोखले

(अरविंद व्यं. गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)

अरविंद व्यंकटेश गोखले हे ’दैनिक केसरी'चे बारावे संपादक. तेथे ते दहा वर्षे सलग संपादकपदी होते. त्यानंतर ते दैनिक ’लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक झाले. गोखल्यांची संपादकीय कारकीर्द ३६ वर्षांहून अधिक आहे.

शिक्षण

संपादन

अरविंद व्यं गोखले हे आधी इतिहास हा विषय घेऊन एम.ए. झाले. लंडनच्या 'कॉमनवेल्थ प्रेस युनियन'ची 'हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप' (१९७९) आणि वॉशिंग्टनच्या 'द हेन्री एल स्टिम्सन सेंटर'ची फेलोशिप (१९९८) मिळवून त्यांनी अनुक्रमे पत्रकारिता आणि भारत-पाकिस्तान संबंध यावर संशोधन केले. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषतः भारत-पाकिस्तान संबंध हे अरविंद व्यं गोखले यांचे अभ्यासाचे खास विषय होत. आपल्या लेखनासाठी त्यांनी अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया यांसह अनेक देशांचे अभ्यासदौरे केले. भारताच्या पंतप्रधानांसमवेतही त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या.

अरविंद व्यं गोखले हे पत्रकारिता अभ्यासक्रमांचे मानद व्याख्याते आहेत.

अरविंद व्यं. गोखले यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अमेरिकेत शिकायचंय? (सहलेखिका सुनिता लोहोकरे)
  • अल काईदा ते तालिबान (‘इनसाइड अल काईदा अँड तालिबान बियॉंड नाईन इलेव्हन’ या सईद सलीम शाहजाद यांच्या पुस्तकाचा अनुवाद)
  • असाही पाकिस्तान
  • अक्षरांजली
  • आय.सी.८१४ (कादंबरी)
  • कारगिल ते कंदाहार
  • परदेशात शिकायचंय? (सहलेखक विजय लोणकर)
  • पाकिस्ताननामा
  • पाकिस्तानात साठ वर्षे (बियाथिल मोईद्दिन ऊर्फ बी.एम. कुट्टी यांनी लिहिलेल्या ’सिक्स्टी इयर्स इन सेल्फ एक्झाईल : नो रिग्रेट्स' या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद. सह‍अनुवादक विजय लोणकर)
  • मंडालेचा राजबंदी
  • संघर्ष बलुचिस्तानचा (प्रकाशन दिनांक ४ जून, इ.स. २०१७)

अरविंद व्यं गोखले यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • आचार्य अत्रे पारितोषिक
  • साहित्यसम्राट न. चिं. केळकर पारितोषिक
  • कै. बाबूराव ठाकूर पत्रकारिता पुरस्कार
  • मराठी भाषासंवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला मराठी भाषाविषयक माध्यमरत्‍न पुरस्कार
  • महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे आदर्श पत्रकारितेसाठीचा लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार (२०१२)
  • पत्रकार कै. वरुणराज भिडे पुरस्कार
  • कै. सुशीलादेवी देशमुख उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा कै. रा. भि. जोशी पुरस्कार


पहा : गोखले