अमेरिका या पुस्तकातून अनिल अवचटांनी अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे..

अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. तरीसुद्धा या पुस्तकात अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, स्थानिक अमेरिकन तथा रेड इंडियन लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला, इत्यादी.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक तरुण/तरुणीने हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'