अमानत अली (उर्दू: امانت علی) (जन्म:१० ऑक्टोबर १९८७) हा पाकिस्तानी शास्त्रीय, पॉप आणि पार्श्वगायक आहे . [२] [३] [४] अमानतने काही भारतीय आणि पाकिस्तानी चित्रपट 'तमन्ना', 'जिंदा भाग', 'दोस्ताना' आणि 'बाल गणेश' या चित्रपटांसाठी पार्श्वगायक म्हणून काम केले आहे.

अमानत अलीचा जन्म फैसलााबाद, पाकिस्तान येथे झाला. त्याने २००६ मध्ये मेकाल हसन बँडसह मुख्य गायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अमानतचा पहिला अल्बम कोहराम होता, जो २००९ मध्ये फायर रेकॉर्ड्सच्या सहकार्याने रिलीज झाला. त्याने पार्श्वगायक म्हणून बॉलीवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला, ज्यात दोस्ताना "खबर नहीं" आणि केसी बोकडिया यांच्या "जुनून" या गाण्यांचा समावेश आहे. अमानत अली हा पाकिस्तानी गायक नझाकत अली यांचा मुलगा आहे.