अभय गणपतराय भारद्वाज (२ एप्रिल, १९५४:कंपाला, युगांडा - १ डिसेंबर, २०२०) हे एक भारतीय वकील आणि राजकारणी होते. हे गुजरातमधील राज्यसभेचे सदस्य होते. [] भारद्वाज भारतीय जनता पक्षाचे नेते होत व महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न होते. भारद्वाज यांनी १९९५ मध्ये राजकोट पश्चिममधून अपक्ष उमेदवार म्हणून गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते जिंकले नाहीत. []

भारद्वाज यांचा जन्म २ एप्रिल, १९५४ रोजी युगांडा मध्ये झाला. तेथे राहणारे त्यांचे कुटुंब १९६९ मध्ये युगांडातील यादवीमुळे त्यांचे भारतात स्थलांतरित झाले.

२००२ च्या गुजरात दंगलीत झालेल्या गुलबर्ग सोसायटी खटल्यातील ते आरोपींचा बचाव करणारे वकील होते. एकाच सोसायटीमधील सुमारे ७० रहिवाशांची हत्या झाल्यावर त्याबद्दलच्या खटल्यात विशेष न्यायालयाने २०१६ मध्ये २४ आरोपींना दोषी ठरवले आणि ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली.

राजकोटचे जिल्हाधिकारी असताना माजी आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात त्यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले.

राजकीय कारकीर्द

संपादन

ते भारताच्या २१व्या कायदा आयोगाचे सदस्य होते आणि त्यांनी मुस्लिम महिला (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ आणि समान नागरी संहिता यांसारख्या कायद्यांमध्ये योगदान दिले. []

२२ जुलै, २०२० रोजी त्यांनी राज्यसभेत भाजपकडून खासदार म्हणून शपथ घेतली.

भारतातील कोविड-१९ साथीदरम्यान १ डिसेंबर, २०२० रोजी चेन्नई येथे कोविड-१९मुळे भारद्वाज यांचे निधन झाले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Gujarat BJP picks old timers Abhay Bharadwaj, Ramila Bara for Rajya Sabha". The Times Of India.
  2. ^ "Abhay Bharadwaj and Ramila Bara BJP candidates for Rajya Sabha election in Gujarat".
  3. ^ "Gujarat riots case defence counsel among new Law Commission members". Hindustan Times.
  4. ^ "Gujarat Rajya Sabha MP Abhay Bharadwaj passes away, PM Modi condoles his death". newsd.in. 1 December 2020. 14 January 2021 रोजी पाहिले.