अपान वायू
इंद्रियांचे आरोग्य टिकवण्यामध्ये मनाचे महत्त्वाचे योगदान असते. आणि दोघांवर नियंत्रण ठेवणारा वायू असतो. याचे पाच उपप्रकार असतात, त्यांना पंचप्राण म्हंटले जाते. या पंच प्राणांची नावे क्रमशः पुढील प्रमाणे आहेत.
- प्राण
- अपान
- व्यान
- उदान
- समान
अपान वायू
संपादनप्राणशक्तीची बहिर्मुखता व बाहेर टाकण्याची संकल्पना. मलविसर्जन , मूत्रप्रवृत्ती, शुक्रस्खलन, स्त्रीमध्ये राजोस्त्राव व गर्भाला बाहेर काढणे तसेच ढेकर व वायू उत्सर्जन या सर्व क्रिया अपान वायूच्या आधीन असतात.