डाॅ. अनुराधा औरंगाबादकर या पाकक्रियांवर पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका आहेत. हंस-मोहिनी-नवल मासिकांचे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर हे त्यांचे वडील होत. आपल्या वडिलांवर त्यांनी 'अंतरकर एक चिकित्सक अभ्यास : लेखक व हंस, मोहिनी, नवलची वाङ्मयीन कामगिरी' नावाचा पीएच.डीचा प्रबंध लिहिला आहे.

औरंगाबादकर यांनी नाशिकच्या गावकरी दैनिकात काम केले.

पुस्तके

संपादन
  • उपवासाचा फराळ
  • ५१ सूपचे प्रकार
  • कचोरीचे ६५ खमंग प्रकार
  • करुणासागर (डाॅ. ह.वि. सरदेसाई -व्यक्ती आणि विचार)
  • कल्पवृक्ष कन्येसाठी (अनंत अंतरकरांचे व्यक्तिचित्रण)
  • किशोरवयीन मुलांसाठी गोष्टी (बालसाहित्य)
  • कैरीचा हंगामा
  • घरच्या घरी करा दिवाळीचा फराळ
  • दुधी भोपळ्याचे २०१ प्रकार
  • सदाबहार देव आनंद
  • नाट्यप्रेमी कमलाकर सारंग
  • भाताचे २१० प्रकार
  • मला दिसलेला आदिवासींचा आदित्य (प्रा. डाॅ. गणेश देवी यांचे व्यक्तिचित्रण)
  • श्री महालक्ष्मीचा नैवेद्य
  • मुखवट्याआडचे चेहेरे (व्यक्तिचित्रणे)
  • लाडूच लाडू
  • लुकलुकणारे विचार दिवे (ललित)
  • विचारधन (वैचारिक)
  • सर्वांसाठी आवडती मधली वेळ (दुपारचे खाणे)
  • सिनेमातली माणसं
  • हसरा सूर्य (कादंबरी)