गावकरी (वृत्तपत्र)

(गावकरी या पानावरून पुनर्निर्देशित)

गावकरी हे नाशिक शहरातील दादासाहेब पोतनीस यांनी सुरुवात केलेले एक अग्रगण्य दैनिक आहे. नाशिकचे आत्ताचे सुप्रसिद्ध दैनिक गावकरी हे प्रथम मालेगाव येथे सुरू झाले. 1 जानेवारी 1938 रोजी दत्तात्रय शंकर पोतनीस यांनी हे पत्र पाक्षिक स्वरूपात काढले 1939 सालि या पत्राचे मालेगाव आतून नाशिकला स्थलांतर झाले. 1947च्या दसऱ्यापासून या पत्राचे दैनिकात रूपांतर करण्यात आले प्रमुख्याने उत्तर महाराष्ट्रात राजकीय विचारांचा प्रसार करून जनजागृतीचे कार्य गावकरी ने केली. गावकरीच्या संपादक मंडळावर सुप्रसिद्ध पत्रपंडित प व गाडगीळ यांनी लोकमान्य दैनिक बंद झाल्यावर काही काळ काम केले. साप्ताहिक गावकरी आता स्वतंत्रपणे मिळतो. गावकरी ही एक आता संस्था बनली आहे. याच संस्थेचे अमृत हे डायजेस्ट स्वरूपाचे मासिक व कला आणि खिळे लावलेले रंग हे साप्ताहिक 1958 पासून निघतो. गांवकरीचे भावंड दैनिक अंजिठा दैनिक औरंगाबाद येथून प्रसिद्ध होते दादासाहेब पोतनीस व चिरंजीव दत्तात्रय पोतनीस हे या संस्थेचे कार्यवाह आहेत.

गावकरी
प्रकारदैनिक

मालकदत्तात्रय शंकर पोतनीस
मुख्य संपादकगाडगीळ
स्थापना१ जानेवारी ९३८
भाषामराठी
प्रकाशन बंदचालू
मुख्यालयभारत मुंबई,नाशिक , महाराष्ट्र, भारत


==संदर्भ== मराठी वृत्तपत्राचा इतिहास