अनिता देवी
अनिता देवी (१६ एप्रिल, १९८४ - ) ही भारतीय नेमबाज आहे. तिचे मूळ गाव हरयाणातील पालवल आहे. २०११ ते २०१९ या दरम्यान तिने सलग राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली आहेत. यात २०१३ मध्ये वार्षिक राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पटकावलेल्या एका सुवर्ण पदकाचाही समावेश आहे.[१] अनिता देवीने २०१६ साली हॅनोवर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एर पिस्तूल (सांघिक श्रेणी) मध्ये एक रौप्य आणि २५ मीटर एर पिस्तूल [1] (सांघिक श्रेणी) मध्ये एक कांस्यपदकसुद्धा जिंकले आहे.[२][3] ती हरयाणा पोलीसमध्ये वरिष्ठ हवालदार म्हणून कार्यरत आहे. [1]
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
संपादनअनिता देवीचा जन्म हरियाणामधील पलवल जिल्ह्यातील लालपूर गावात एका पैलवानांच्या कुटुंबात झाला. तिच्या पैलवान वडिलांना वाटायचे की तिनेसुद्धा कुस्तीमध्ये आपले नाव कमवावे. परंतु अनिताला त्यात तितका रस नव्हता. २००८ मध्ये हरियाणा पोलिसमध्ये हवालदार म्हणून नोकरी लागल्यानंतर तिने नेमबाजीचा खेळ निवडला. सुरुवातीला तिचा नेमबाजी निवडण्याचा हेतू फक्त नोकरीत पदोन्नती मिळावणे, इतकाच होता. अनिताला तिच्या विभागाकडून नेमबाजीच्या सरावासाठी विशेष परवानगी मिळवावी लागत असे. तिने कुरुक्षेत्र येथील गुरुकुल शूटिंग रेंजमध्ये सरावाला सुरुवात केली. यासाठी तिला आपल्या सोनिपत गावापासून दररोज दोन-दोन तासांचा प्रवास करावा लागायचा. तिच्या पतीचा तिला पूर्ण पाठिंबा होता, त्यांनीच तिला एक पिस्तूल विकत घेऊन दिली. लवकरच तिने पदके जिंकण्याची सुरुवात केली. २०१३ मध्ये तिने अखिल भारतीय पोलीस स्पर्धेमध्ये ३ सुवर्ण पदके मिळवली. नेमबाजीला जास्त वेळ द्यावा लागत असल्याने तिच्या पोलीस नोकरीवर परिणाम होऊ लागला. मग तिच्यावर पोलीस विभागाकडून नोकरी किंवा खेळ यामधून काही एक निवडण्यासाठी दबाव टाकला जावू लागला. अखेर खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने राजीनामा दिला, परंतु हरियाणा पोलीस विभागाने तिचा हा राजीनामा नाकारला. देवीने २०११ पासून २०१९ पर्यंत प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीवर पदके पटकावली. आता तिच्या पुत्राने सुद्धा नेमबाजी करायला सुरुवात केली आहे आणि त्याने ऑलिम्पिक पदक जिंकावे, अशी तिची इच्छा आहे. ते दोघे कसे एकत्र सराव करतात, याविषयी बोलताना अनिता हेही सांगते की मायलेकांच्या या जोडीने एकत्र सराव करावा आणि पुढील राष्ट्रीय खेळांमध्ये एकत्र भाग घ्यावा, असे तिचे स्वप्न आहे.
कारकीर्द
संपादन२०१३मध्ये अनिता देवीने अखिल भारतीय पोलीस स्पर्धेत ३ सुवर्ण पदके आणि नेमबाजचा प्रथम पुरस्कार जिंकला. या मागोमाग तिने त्याच वर्षी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर एर पिस्तूल श्रेणीत राष्ट्रकुल खेळातील सुवर्ण पदक विजेती अनिसा सय्यदला पराभूत करीत एक सुवर्ण पदक जिंकले.[३] २०१५ मध्ये तिने राष्ट्रीय खेळांमध्ये एक रौप्य पदक जिंकले. [1] २०१६ साली हॅनोवर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एर पिस्तूल सांघिक श्रेणीत एक रौप्य आणि २५ मीटर एर पिस्तूल सांघिक श्रेणीत एक कांस्य पदक तिने जिंकले. [2][3]
संदर्भ
संपादनhttps://www.bbc.com/marathi/india-55964570 [1]
https://i-s-c-h.de/uploads2016/m2.40.11.pdf [2]
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Full name | अनिता देवी |
Citizenship | भारतीय |
जन्म |
१६ एप्रिल १९८४ लालपूरगाव, पलवल जिल्हा, हरयाणा |
Sport | |
खेळ | नेमबाजी |
https://i-s-c-h.de/uploads2016/m2.10.11.pdf [3]
http://archive.indianexpress.com/news/anita-dharmendra-make-it-a-day-for-rookies/1208930/ [4]
- ^ "BBC News मराठी".
- ^ "सदस्य:Its Tarushi/प्रयोगपृष्ठ". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2021-02-18.
- ^ "Anita, Dharmendra make it a day for rookies - Indian Express". archive.indianexpress.com. 2021-02-20 रोजी पाहिले.