अनंत राऊत

प्रा.डॉ.अनंत दा. राऊत हे भारतात संविधान संस्कृती निर्माण व्हावी यासाठी युवा प्रबोधन मंचाच्या मा


प्रा. डाॅ. अनंत दादाराव राऊत (जन्म : गोटेगांव-बीड, १ ऑगस्ट १९६५) हे नांदेड येथील पीपल्स काॅलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख आहेत. त्यांनी या काॅलेजात १९९० सालापासून पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. ते एक मराठी साहित्यिकही आहेत.

अनंत राऊत हे नांदेडच्या युवा प्रबोधन मंचाचे १९९९ सालापासून संस्थापक अध्यक्ष आहेत.

ते २००२ सालापासून संविधान गौरव महोत्सव हा नावीन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आयोजित करतात. त्यांची या विषयावर सतत व्याख्याने होत असतात.


पुस्तके संपादन

  • अनंताची अभंगवाणी (काव्यसंग्रह)
  • आदरणीय गुरू (पत्रात्मक व्यक्तिचित्रे)
  • काहिली (कादंबरी)
  • चला ठेचू नांगी नांगी (कवितासंग्रह)
  • छिन्नमही (कवितासंग्रह)
  • तळभारत (कथा संग्रह)
  • तुलनात्मक साहित्य आणि विश्वकुटुंबाची घडण( समीक्षा)
  • धर्म ते राष्ट्रधर्म (वैचारिक )
  • प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये (वैचारिक)
  • भारतीयांचा पवित्र आचारग्रंथ : भारताचे संविधान (वैचारिक)
  • भारतीयांचा राष्ट्रधर्म (वैचारिक)
  • भारतीयांचे कल्याणकारी संविधान (वैचारिक)
  • मूल्यनिष्ठ समाजघडणीत साहित्याची भूमिका (समीक्षा)
  • विद्रोहमूल्य (समीक्षा)
  • समाज सुधारकांची तुतारी (वैचारिक)
  • संविधानमय भारताची दिशा (वैचारिक)
  • संविधानाचे तत्त्वज्ञान व जातिअंत (वैचारिक)

पुरस्कार संपादन

अनेक.