अनंत अथवा अगणित ही एक व्यापक संकल्पना असून तिचा गणितात, तत्त्वज्ञानात आणि 'Theology'मध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो. मराठीमध्ये हा शब्द विषयाप्रमाणे अथांग, अमर्याद अशा अर्थांनीही ही संकल्पना उपयोगात आणतात. साधारणपणे अनंत ह्याचा अर्थ ज्या गोष्टीला अंत नाही असा घेतात. गणितात अनंत ही कल्पना किंवा संज्ञा ∞ या चिन्हाने दर्शवितात. शून्य सोडून कोणत्याही संख्येला शून्याने भागितले की अनंत ( ∞ ) हे उत्तर मिळते. व्यावहारिक गणितात आपल्याला प्रचंड वाटणाऱ्या N या संख्येपेक्षा जी संख्या खूप मोठी असेल, तिला तत्त्वतः ’अनंत’ म्हणता येते. गणितात वेगवेगळ्या संदर्भात अनंत ही संकल्पना वापरतात. (उदा. अनंत ही एक संख्या आहे असे मानले तर तिचा अर्थ जी मोजता येणार नाही अशी संख्या असा होतो.)

वेगवेगळ्या टाईपफेस[मराठी शब्द सुचवा] मधे अनंतचे चिन्ह, ∞.

१, ३, ५, ७, १३, १९ अशा अविभाज्य अंकांची एकूण संख्या अमर्यादित आहे.

л (पाय) किंवा `e' किंवा तत्सम संख्येतल्या दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अगणित असते आणि उत्तरात पुनरावृत्ती न होणाऱ्या संख्या येतात.

छेदात दोन आणि/किंवा पाच यांच्याच पटीतली संख्या नसेल तर, अंशाला छेदाने भागितल्यावर येणाऱ्या उत्तरात दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या अमर्याद असली तरी तिच्यात पुनरावृत्ती होणाऱ्या संख्या असतात.