अध्यापन
अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली .[ संदर्भ हवा ]
शिकण्या-शिकवण्याच्या पध्दतींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अध्यापन शास्त्र होय. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | branch of science, academic major | ||
---|---|---|---|
उपवर्ग | Geisteswissenschaft, शिक्षण | ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
अध्यापनशास्त्रावरील पुस्तकेसंपादन करा
- अध्यापन आणि नवनिर्मिती (प्रवीण दवणे)
- अध्यापन : उपागम आणि कार्यानिती (कार्यनीती?) (सुनिता ढाके, स्वाती चव्हाण)
- अध्यापन का? कसे? (प्रकाशक -सरस्वती बुक कंपनी)
- अध्यापन गणिताचे (दोन भाग; अ.तु. मावळंकर, हे.चिं. प्रधान, र.म. भागवत)
- अध्यापनशास्त्र आणि पद्धती (म.बा. कुंडले)
- इंग्रजीचे अध्यापन (दिवाकर वेल्हाळ)
- उत्तम अध्यापनची रहस्ये (संपादित, मूळ इंग्रजी संपादक : डाॅ. श्रीमती विनय किरपाल; मराठी अनुवाद : डाॅ. संध्या काणे; संपादक : डाॅ. अशोक रा. केळकर)
- कथाकथनातून अध्यापन (अपर्णा निरगुडे, शामराव कराळे)
- कला अध्यापन (प्रा. जयप्रकाश जगताप)
- भूगोल : अध्ययन व अध्यापन (भा.गो. बापट)
- भूगोल अध्यापन (डॉ.विनया रणसिंग)
- मराठीचे अध्यापन (अकोलकर, पाटणकर)
- मराठीचे अध्यापन (प्रा. कल्याणी इंदूरकर)
- मराठीचे अध्यापन (डॉ. माधव पोतदार)
- मराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे (प्रा. सत्यवान मेश्राम)
- शैक्षणिक तत्त्वज्ञान (य.ज. धारूरकर)
- शैक्षणिक संघटना, प्रशासन व प्रश्न (भा.गो. बापट)
- साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे)
- साहित्य आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा (डॉ. वा.पु. गिंडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह, संग्राहक - डॉ. सतीश बडवे)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|