अधातु (non-metals) रासायनिक वर्गीकरणात वापरला जाणारा एक शब्द आहे. आवर्त सारणी मधील प्रत्येक मूलद्रव्य आपल्या रासायनिक व भौतिक गुणधर्मा नुसार धातु अथवा अधातु श्रेणी मध्ये वर्गीकृत करता येते. ( काही मूलद्रव्यांत दोन्हीचे गुणधर्म आढळले आहेत, त्यांस उपधातु (मेटालॉइड) या श्रेणीत स्थापीत केले जाते.)

आवर्त सारणीत १४ (XIV) ते १८ (XVIII) या समूहांत वरील उजव्या कोपऱ्यात स्थित आहेत. याशिवाय प्रथम समूहांत सर्वात वरील हायड्रोजन हा अधातु आहे. हायड्रोजन व्यतिरिक्त ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, हैलोजन, तथा निष्क्रिय वायू अधातु मानले जातात.

साधारणतः आवर्त सारणीतील केवळ १८ मूलद्रव्य अधातु वर्गात आलेले आहेत, तर धातु वर्गात ८० हून अधिक मूलद्रव्य आलेले आहेत. तथापि, पृथ्वी गर्भ, वातावरण आणि जलावारण यांत अधातु बहुतांश आहेत. सजीव संरचने मधेही अधातु अधिकांश आहेत.