अदिती भागवत (१८ जानेवारी १९८१) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कथक आणि लावणी तज्ज्ञ, अभिनेत्री, नृत्य शिक्षक आणि कोरियोग्राफर आहे. तिने मुंबईत तरुण आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना कथक नृत्य शिकण्यासाठी अदिती नृत्य अकादमी सुरू केली. ती जगभरात प्रवास करते आणि स्टेज शोमध्ये सहभागी होऊन इतर भारतीय संगीत कलांचे सहकार्य करते.२००७ मध्ये नालंदा नृत्य आणि संशोधन अकादमी, मुंबई यांनी अदिती यांना "नालंदा नृत्य निपुण" अशी उपाधी दिली.

अदिती भागवत
अदिती भागवत
जन्म अदिती भागवत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी