अडकित्ता हे दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार, हे एक सुपारी कापण्याचे प्राथमिक प्रकारचे सोपे हस्तचालित यंत्र आहे. हे यंत्र पितळेचे किंवा लोखंड अथवा स्टीलचे असते.[] लातूर तालुक्यातील मौजे तांदुळजा येथील कारागिरांचे अडकित्ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तांबूल सेवन करणाऱ्या साहित्यातील अडकित्ता हा महत्त्वाचा भाग असून सुपारी कातरण्यासाठी अडकित्त्याचा वापर होतो. ग्रामीण भागात बैठकीमध्ये पाहुण्यांसाठी पानपुडा ठेवला जातो. त्यामध्ये पान, बडिशेप, लवंगा, सुपारी, कात यांबरोबर सुपारी कातरण्यासाठी अडकित्ता देखील असतो. साचा:चित्रहवे


संदर्भ

संपादन
  1. ^ "संग्रहालय | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com. 2020-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-02 रोजी पाहिले.