अटाळी
अटाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोडतं, मुंबई-कसारा रेल्वेमार्गावर आंबिवली स्थानकाचे पश्चिम भाग हे अटाळी गावाचं क्षेत्र आहे.काळू नदी व उल्हास नदीच्या संगमावर हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे, बहुतांश कोळी जमातीचे हे गाव आहे, मासेमारी, भातशेती व ताडाच्या झाडापासून मिळणारी ताडी व ताडगोळे हे येथील प्रमुख उत्पन्न आहे.. भौगोलिकदृष्ट्या व धार्मिकदृष्ट्या हे गाव विशेष आहे कारण हे गाव पूर्वेकडे काळू नदी व भातसा नदीचे संगम व पश्चिमेकडे काळू नदी व उल्हास नदीचे संगम या दोन संगमाच्या मधोमध वसलेले आहे, म्हणुनच येथील काळू नदी व उल्हास नदी संगमाच्या जवळ निसर्गाच्या कुशीत गर्द ताडाच्या व अनेक मोठ्या वृक्षांच्या वनराईत फार सुंदर असे 'श्री दत्त देवस्थान,(मठ)' आहे,येथे परमशांतिचा अनुभव मिळतो तसेच येथे दत्त जयंती उत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.या गावात हनुमान व विष्णू देवाचं मंदिर आहे, श्री विष्णू देवाची काळ्या पाषाणातील मूर्ती बाजुच्याच काळू नदीच्या पात्रात सापडली आहे, नदी किनारी एक प्राचीन देवालय आहे.
?अटाळी अटाळी कोळीवाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव (कोळीवाडा) — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कल्याण |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
नगरसेवक | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२११०२ • +०२५१ • एमएच/०५ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनहे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद (३६ किमी/तास) आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.