अजय देवगण

(अजय देवगन या पानावरून पुनर्निर्देशित)

विशाल देवगण भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांना अजय देवगण या नावाने ओळखले जाते. त्यांनी १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमधे अभिनय केलेला आहे. तसेच ते चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. त्यांनी काही सिनेमांमध्ये दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे[१].

अजय देवगण
जन्म विशाल वीरु देवगण
०२ एप्रिल १९६९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १९९१ -
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट कंपनी, हम दिल दे चुके सनम, राजनीती, गंगाजल, गोलमाल, प्यार तो होना ही था
वडील वीरु देवगण
आई वीणा देवगण
पत्नी काजोल
अपत्ये
धर्म हिंदू

व्यक्तिगत जीवनसंपादन करा

अजय वीरु देवगण ज्यांना सर्व त्यांच्या स्टेज, चित्रपटातील व्यावसायिक नावाने ओळखतात त्यांचं खरं नाव विशाल देवगण आहे. फिल्मसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपले नाव अजय देवगण ठेवले कारण जेव्हा अजय देवगणने पदार्पण केले तेव्हा अनेक दुसरे अभिनेते पदार्पण करत होते त्यांचं नाव सुद्धा विशाल होतं. त्यापैकी एक प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांच्या मुलाचे नाव पण विशाल होतं.[२] अजयचे वडील वीरु देवगण आणि त्यांची आई वीणा देवगण आहे. चित्रपट अभिनेत्री काजोल ही त्यांची पत्नी आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना एक भाऊ पण आहे. अजयचे पूर्वज हे पंजाब मधील अमृतसर येथील होते. अजयचे बाबा वीरु देवगण हे हिंदी चित्रपट सृष्टीतील फाइट कोरिओग्राफर होते.

चित्रपट कारकीर्दसंपादन करा

अजय देवगणने फूल और काटे (१९९१) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिलवाले, जिगर, दिल जले, सुहाग अश्या हिट चित्रपटांत भूमिका साकारली. तसेच गोलमाल चित्रपट शृंखलेत हास्य अभिनय केला. सिंघम, रास्कल्स, सन ऑफ सरदार, तान्हाजी, भूज ह्या सिनेमांमध्ये अभिनय केला. अजय देवगणने यू मी और हम आणि शिवाय हे सिनेमा दिग्दर्शित केलेत.

संदर्भसंपादन करा

  1. ^ बातमीपत्र, लोकमत (२०२०). "अजय देवगण". महाराष्ट्र: लोकमत वृत्तपत्र. pp. १.
  2. ^ https://www.deccanchronicle.com/entertainment/bollywood/140318/ajay-devgn-jail-bars-real-name-vishal-akshay-phool-kante-unknown-facts.html