अग्रणी संगमनाथ बंधारा

अग्रणी संगमनाथ बंधारा हां महांकाली नदीवर बांधलेला तलावापासुन तिसरा बंधारा आहे.हा बंधारा कोकळे गावांतील कोकळे - बसप्पावाडी रोड वर असलेल्या पवार मळा येथे संगमनाथ मंदिराजवळ बांधलेला आहे म्हणून या बंधाऱ्याचे नाव अग्रणी संगमनाथ बंधारा असे ठेवण्यात आले आहे. अग्रणी संगमनाथ बंधारा हा अग्रणी नदीच्या महांकाली या उपनदीवर जलबिरादरी आणि लोकसहभागातुन बांधलेला बंधारा आहे.अग्रणी संगमनाथ बंधारा हा कोकळे गावात असून गावापासून पुलापासुन 1003मिटर अंतरावर महांकाली नदीवर आहे.या बंधाऱ्याचा एकूण बांधकाम खर्च 43 लाख 14 हजार रुपये एवढा आला आहे.बसप्पाचीवाडी तलाव पासून अग्रणी संगमनाथ बंधाराचे अंतर हे 5.5 किमी असून तलावातून सोडलेले पाणी हे महांकाली नदीवर असलेल्या सर्व पाच बंधारामधून वाहत पुढे जाते. अग्रणी संगमनाथ बंधाराची उंची ही 2.5 मीटर (8 फूट 3 इंच) एवढी असून लांबी 45 मीटर (150 फूट) आहे तसेच या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ही 7 कोटी लिटर आहे.अग्रणी संगमनाथ बंधाराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1998 फूट आहे तसेच अक्षांश 17.00003 डिग्री आणि रेखांश 75.02502 डिग्री आहे.अग्रणी संगमनाथ बंधाराच्या जवळ आणि महाकाली नदीच्या पात्राच्या कडेला एकूण 8 विहीर आहेत.अग्रणी संगमनाथ बंधाराचे बांधकाम चालू असताना अतिशय पाणी टंचाई या परिसरात होती पण पवार मळातील सर्व युवा तरुण;जलबिरादरीचे कार्यकर्ते आणि गावांतील काही युवा लोक मिळून सर्व विहीर; बोअरवेल मधील पाणी एकत्र करून हा अग्रणी संगमनाथ बंधारा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला.अग्रणी संगमनाथ बंधाराचे बांधकाम हे सप्टेंबर 2017 मधे पूर्ण झालें असून तेव्हा पासून हा बंधारा या परिसरातील लोकांसाठी जीवनदायी ठरला आहे.या बंधारामधील पाणी साठा सर्व शेतकरी आपल्या शेतीसाठी;जनावराना पिण्याच्या पाण्यासाठी आणि रोजचा दैनंदिन कामासाठी खुप उपयोग होतं आहे तसेच या बंधारा मधे पाणीसाठा टिकून राहिल्यामुळे परिसर हिरवागार झाला आहे आणि आपला शेतकरी वर्ग खुप खुप सुखी झाला आहे. अग्रणी संगमनाथ बंधारा परिसरामध्ये ऊस;मका;ज्वारी;गहू;बाजरी ही पीके प्रामुख्याने घेतली जातात तसेच सोयाबीन;हरभरा;उडीद;भुईमूग अशी पीके आणि केळी;आंबा;चिंच अशी फळे घेतली जातात.