अग्रणी नदीचा उगम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तामखडी गावापासून होतो. तामखडीची भूमी अगस्ती ऋषींच्या वास्तव्याने पावन झाली अहे, असे सांगण्यात येते. या नदीच्या खोऱ्यात एकूण सात पाणलोट क्षेत्रे आहेत. खोऱ्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पाच तालुके (खानापूर, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, मिरज) आणि कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुका असे सहा तालुके येतात. सांगली जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातील १०७ गावे ह्या खोऱ्यात येतात. अग्रणी नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ती अथणी तालुक्यातील हुल्लगबल्ली गावात जाऊन कृष्णा नदीस मिळते. या नदीला पाणलोटक्षेत्र KR-38 मधून महांकाली नदी नावाची २२.५ किमी लांबीची उपनदी येऊन Agrani River la मिळते.[ संदर्भ हवा ]

भौगोलिक तपशील

संपादन

शासनाच्या व लोकांच्या सहभागातून २०१३ मध्ये अग्रणी नदीचे पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले. []जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात आलेला ह्या प्रकल्पामुळे ‘अग्रणी’चा एकूण ५५ किलोमीटरचा प्रवाह नव्याने वहाता झाल्यास खानापूर, कवठेमहांकाळ, जत या कायम दुष्काळी तालुक्यांतील १०७ गावांना नदीच्या पाण्याचा लाभ होणार आहे.[] ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र सांगली जिल्ह्याने राज्याला दिला; परंतु जिल्ह्यातीलच बारमाही वाहणाऱ्या अग्रणी नदीचे अस्तित्त्वच गाळ, माती व झाडाझुडपाने लुप्त झाले होते. पूर्वी येथे नदी होती असे सांगावे लागत होते, अशी परिस्थिती होती. मात्र, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून या नदीचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.[]

जलसंधारणाची कामे

संपादन

नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम झालेल्या खानापूर तालुक्यात ८ ऑक्टोबर २०१५ ला झालेल्या परतीच्या एकाच पावसाने अग्रणी नदी प्रवाहित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर ‘अग्रणी’ दुथडी भरून वाहू लागल्याचे पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडू लागली आहे. - []

महापूर

संपादन
  २०१९ मध्ये परतीच्या पावसाने अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने दि. ५-६ ऑक्टोबर २०१९ रोजी बऱ्याच वर्षानंतर प्रथमच शिरढोण वगळता पुलावरून पाणी वाहत होते.
  पुराचे पाणी ओसरत असतानाच पुन्हा दि. ९ ऑक्टोबर च्या रात्री या भागात तुफान पाऊस झाला. सिद्धेवाडी तलाव १००% भरून त्याचे पाणीसुद्धा अग्रणीला मिळाले. यामुळे दि. १० ऑक्टोबर रोजी पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली. हा पूर मागच्या वेळीपेक्षा तीव्र होता.

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://www.loksatta.com/vruthanta-news/renewal-of-agrani-river-by-villager-of-khanapur-in-sangli-92593/
  2. ^ गरिमा, मिश्रा (१ एप्रिल २०१७). "Sangli: 107 villages join hands to rejuvenate Agrani River Basin". The Indian Express. ७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन" (PDF). केसरी. ९ ऑक्टोबर २०१७. 2018-12-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ "एका नदीचा पुनर्जन्म - सकाळ दैनिक". सकाळ दैनिक. ८ ऑक्टोबर, इ.स. २०१५. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]