अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषत: त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालॅंड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.याच्या खोड़ाला लागलेली बुर्शी पासून खोड काळे होते ते उपयुक्तांग आहे.

अगर वृक्ष भाग

उपयोगसंपादन करा

अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.

अगरवृक्षाची अन्य नावेसंपादन करा

 • अरबी - ऊद
 • इंग्रजी - Iron Wood, Eagle Wood
 • गुजराथी - अगर
 • जपानी - को
 • तमिळ - आगलिचंद
 • तेलुगू - अगुई
 • बंगाली - अगरु
 • मराठी - अगर, ऊद
 • शास्त्रीय नाव - Aquilaria malaccensis
 • संस्कृत - अगरि, कृमिजग्ध, लोह
 • हिंदी - अगर