अकाल’ म्हणजे काल रहित वा ज्याच्यावर कालाची सत्ता चालत नाही , जो भूत, भविष्य , वर्तमान यापलीकडे असतो, तो , म्हणजे परमेश्वर. ह्या अकालपुरुष परमेश्वरात रममाण होणारे, त्याची उपासना करणारे , त्यांना ‘अकाली’ म्हणले गेले..शिख धर्मात हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे. गुरू गोविंदसिंह यांनी स्थापना केलेल्या खालसा पंथ चे अनुयायी अकाली म्हणूनच ओळखले जातात.

औरंगजेबाच्या अत्याचारांच्या विरोधात अकालींनी संघटित होऊन आपल्या दलाची उभारणी केली ‘सत् श्री अकाल’ ही त्यांची रणगर्जना होती.अकाली सेनेची एक शाखा सरदार मानसिंह याच्या नेतृत्वाखाली निहंग या नावाने प्रसिद्ध झाली. निहंग लोक अविवाहित राहून साधुवृत्ति धारण करून रहातात.

अधिक वाचन

संपादन
  • मराठी विश्वकोश : भाग १